My Blog List

Monday, May 24, 2021

*जीवन त्यांना कळले हो*

                                                          

                                 *जीवन त्यांना कळले हो* 

                                                                    *डॉ परमेश्वर पाटील,* 

                                                सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी.

मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे , प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न गुणवैशिष्ट्यांनी युक्त असते. ती अनेक चांगले वाईट गुण घेऊन सतत वावरत असते. व्यक्ती दोषाचा व चुकीचा पुतळा असते, मात्र जी व्यक्ती  आपल्यातील दोष कमी करण्याचा कायम प्रयत्न करते व इतरांकडून तसाच आग्रह धरते ती नक्कीच नावलौकिक प्राप्त करते.  कारण शरीर व मनाला लागलेली  कोणतीही सवय सहजासहजी कमी अथवा नाहीशी करणे हे तसे कठीण! मात्र अशक्य नसते. याच न्यायाने तिची वजाबाकी करण्याचा प्रयत्न जीवनाच्या धोपट मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी पुरेसा असतो. आणि मग खऱ्या अर्थाने जीवन प्रवास सुरू होतो.
खरं तर बऱ्याच वेळ इतरांचे उणे- दूने काढणे, दोष दाखवणे, समोरचा कसा चुकीचा आहे आणि मी कायम कसा इतरांना सावरतो, समजून घेतो, माझ्यामुळेच हे शक्य झाले, प्रत्येक घटनेत माझी भूमिका कशी महत्वाची होती हे ठासून सांगत सर्व काही मी होतो म्हणूनच!. 
असे कायम मी पण गाजविण्याची व गाजावाजा करण्याचा जणू शरीर आणि मनाने ध्यासच घेतला तर आपण आपल्या जीवनाचा धोपट मार्ग सोडून लांब कुठेतरी खाईत चाललो आहोत.  
असं समजण्यास जाणत्या मनुष्यास हरकत नसावी.

जगाच्या पाठीवर अनेक थोर महापुरुष होऊन गेले. ते मनुष्य धर्माच्या गुण वैशिष्ट्यांनी युक्त असेच होते. कारण आपल्या जीवनाचं झिजणं हे स्वतः साठी नसून इतरांच्या नखभर तरी कामात आलं पाहिजे तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे याची सतत जाणीव ठेवत. समाज हित व समाजकार्याचा वसा घेऊन आयुष्यभर खडतर प्रवास अंगिकारला. याउलट नाव व प्रसिद्धीची अभिलाषा न बाळगता  केवळ काम हे सेवा म्हणून करत राहणे हे थोर  व्यक्तींच्या जीवनाचे सार आहे. कितीही मोठे काम केले, त्यासाठी कितीही यातना भोगल्या, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही मी हे केले! माझ्यामुळे हे  झाले! असा भ्र शब्द...ही न काढणारी माणसाचं खऱ्या अर्थाने जीवन जगले असं म्हणता येईल. कारण 
 *तुजसाठी जनन ते जनन
तुजवीण जनन ते मरण* 

अशी भूमिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकत नाही. 

थोर महात्मे होऊन गेले
चरित्र त्यांचे पहा जरा। 
आपण त्यांच्या समान व्हावे, 
हाच सापडे बोध खरा।। 

आपण त्यांच्याप्रमाणे वागावे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे, असाच बोध त्यामधून होतो.
'मी' आणि 'माझे' या ऐवजी  किमान ' आपण ' आणि ' आपले ' अशा शब्दप्रयोग करण्यापासून जरी सुरुवात केली तरी आपण आपल्याला चिकटवून घेतलेला अहंकार सोडून इतरांसाठी जगणं, वागणं या दिशेने मार्गक्रमण करण्यास आरंभ केला आहे असे म्हणता येईल. व आपण याच सन्मार्ग चालत राहिलो तर आपलं जगणं जगणं न राहता इतरांचं जिणं व जीवनाला अर्थ प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही.

आपल्या विशिष्ट वाढत्या  वयाबरोबर विचारांची उंची गाठली , मनाच्या कक्षा रुंदावल्या तर आपलं अहंभाव बाजूला जाऊन जीवनात सत्व येईल, आपल्या कार्याचा दरवळ सुटेल जसा एखाद्या पिकलेल्या रसाळ फळाचा सुटावा ना अगदी तसा!  व आपणास आपल्या जगण्याचा खरा अर्थ उमगेल 

' मीपण ज्यांचे पक्व फळापरी 
सहजपणे गळले हो
जीवन त्यांना कळले हो'  
याची नक्कीच सार्थता पटल्यावाचून राहणार नाही.

Wednesday, March 10, 2021

संप्रेषण कौशल्य (communication skills)

संप्रेषण कौशल्य (communication skills) 

1) How can you model communication skills for your students?


विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण कौशल्य विकसित करण्यासाठी अनेक बाबी विचारात घेता येतील त्या पुढीलप्रमाणे.
 1) सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक  सहभाग नोंदवून चर्चेत त्यांची भूमिका सक्रिय ठेवण्याची योजना आखली पाहिजे.
 2) अध्ययन घटकाची तयारी करताना गटचर्चा, सादरीकरण, संवाद, मत मांडणे, अशा स्वरूपात करण्यात यावी जेणेकरून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल.

3) विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे रेकॉर्डींग करण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांना वर्गात संवाद कसे कार्य करतात हे समजण्यास मदत होईल. व त्यात सुधारणा करता येईल 
4) सर्व विद्यार्थ्यांना वर्ग चर्चेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. 
5) केवळ नेहमी उत्तर देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केंद्रित न करता संपूर्ण वर्गातील प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.
 6) छोट्या गटातील चर्चेसाठी वारंवार संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे  मोठ्या प्रमाणावर चर्चेला हातभार लावण्यासाठी विद्यार्थी जितक्या वेळा एकत्रितपणे काम करतील तितकेच वर्गातील वातावरणात ते सहज संवाद साधण्याची कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.

7)  आपल्या विद्यार्थ्यांना थोडे मुक्त वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
8) जेव्हा आपण वर्ग रचनेत बदल करता किंवा एखादी असाइनमेंट देता, तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांसह आपल्या हेतूंबद्दल मोकळे रहा आणि त्यांचा अभिप्राय घ्या. 
9) आदर आणि मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला तर, आपण आपल्या विद्यार्थ्यांशी विश्वासार्हतेचे वातावरण वाढविण्यास आणि त्यांच्यात संप्रेषण कौशल्य विकसित होण्यास मदत होऊ शकते.

 2) How can you emphasize communication skills in general and oral communication skills in particular in your classroom?

आपल्या वर्गातील विशेषत: सामान्य आणि मौखिक संप्रेषण कौशल्यांमध्ये आपण संवाद कौशल्यांवर आपण भर देऊ शकतो ते पुढीलप्रमाणे.

 तोंडी संप्रेषणाच्या प्रकारांमध्ये औपचारिक संप्रेषण समाविष्ट आहे, जसे की वर्ग व्याख्याने, कथा कथन, निवेदन, भाषण आणि संमेलने सादरीकरण आणि अनौपचारिक संप्रेषण, जसे की,  प्रासंगिक फोन वरील संवाद किंवा  बस स्टँड वरील  संभाषणे इ. समावेश होतो.

 शिक्षक त्यांच्याशी वर्गात त्यांच्या भाषेत थेट संवाद साधून आणि अप्रत्यक्षपणे उत्तेजन देणारे वातावरण तयार करुन मुलांना चांगल्या तोंडी भाषेची कौशल्ये विकसित करण्यात मदत करतात.

  3) How can students be encouraged to give oral presentations to varied community audiences?

विविध प्रेक्षकांपुढे आपले तोंडी सादरीकरणे देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढील बाबी लक्षात घेता येतील.

 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील सादरीकरण करण्यासाठी  प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. जसे वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, गीत गायन इ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन समूह संवाद साधता येतो.  असे केल्याने त्यांचे सादरीकरण स्पष्ट, व्यस्त आणि प्रभावी आहे की नाही हे निर्धारित करू शकेल.

 कार्य संघांना प्रोत्साहित करणारे आणि प्रत्येकाकडून अभिप्राय मिळविण्यात विद्यार्थ्यास मदत करणारे गट सादरीकरण देणे.

 विद्यार्थ्यांना मोठ्या गटासमोर   वैयक्तिक सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केल्यास आत्म विश्वास वाढविण्यासाठी मदत होते.

तोंडी परीक्षा घेणे, भूमिका निगडित चर्चा आयोजित करणे, कॉन्फरन्समध्ये भाग घेणे इत्यादी वर्गातील विविध उपक्रम राबविल्यास निश्चितच त्यांची चांगली तयारी होऊ शकते.

4) How can you encourage students in your class to be better communicators?

आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना अधिक चांगले संवाद साधण्यास प्रोत्साहित कसे करू शकतो त्यासाठी पुढील बाबी विचारात घेता येतील.

 1) विद्यार्थ्यांना नेहमी बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे,  आपले मत मांडणे, प्रस्न विचारणे यासाठी प्रोत्साहित करणे.

  2) विद्यार्थ्यांना संभाषण प्रोत्साहित करणे.

 3) विद्यार्थ्यांना आपले मत मांडताना नेहमी मोठ्याने बोलण्याची आणि स्पष्टपणे बोलण्याची सवय लावावी.

 4) उच्चार स्पष्टता व स्वरातील सूक्ष्मता  या बाबी लक्षात घेऊन बोलण्यास जाणीव पूर्वक सूचना द्या.

 5) त्यासाठी भाषा प्रयोग शाळेची मदत घेऊन  विद्यार्थ्यांना सराव देता येईल.

  6) विद्यार्थ्यांच्या सर्वासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका तयार करून सराव घेता येईल.
7) वर्गात नेहमी छोटे छोटे सादरीकरण उपक्रम राबविल्यास (जसे - स्व परिचय देणे, प्रसंग सादर करणे )  निश्चितच निश्चितच त्यांचे संवाद कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.

5) How can students be encouraged to use technology and new media to communicate innovatively and effectively?

नाविन्यपूर्ण आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमांचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येईल ते पुढीलप्रमाणे.

  1) विद्यार्थ्यांना  सद्य तंत्रज्ञान साधनांची उपलब्धता, सहजता, सुकरता व गुणवत्ता या बाबी लक्षात आणून शिक्षणासाठी नवीन संधी याविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

2) नाविन्यपूर्ण आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमांचा व्हिडिओसह वापर करून प्रेरित करता येईल.

 3) विद्यार्थ्यांना मोबाईल अॅप्स वापराविषयी माहिती देणे.

 4)वर्गात स्वतः विविध  तंत्रज्ञान साधने वापरणे जेणे करून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजेल.
 5) अध्यापनासाठी वर्गात आणि बाहेरील तंत्रज्ञानाचा वापर करा.

 6) विविध तंत्रज्ञान साधने वापरणे यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी.

शब्द सामर्थ्य

शब्द सामर्थ्य


अक्षरांची सकाळ झाली
शब्द शब्द उगवून आली
सूर्य किरणांच्या तेजाने
शब्दशेती फुलली

शब्द आल्विती
शब्द गाती
काकड आरती
 नाद घुमविती

शब्द मनातले
शब्द स्वप्नातले
घेऊ लागतो आकार
शब्द करतात दिवसाची सुरुवात

शब्दच फुटेना
भीड तुटेना

शब्दांनीच वाढते काळ
शब्दच देतात बळ
ऐकमेकमची सळ
शब्दच पडतात भुरळ

शब्द कधी बाप
शब्द कधी ताप
शब्दच मायेची कूस
शब्द लावायची फुसही

*जीवनाविषयी थोडसं ......*

                                                                         *जीवनाविषयी थोडसं ......* 


'जीवन ' म्हणजे काय? हे तसं एका शब्दात, वाक्यात सांगणं कठीण ! जीवन म्हणजे अत्यंत गुंतागुंत. जन्माने जीवनाचा प्रवास तर सुरू होतो. मात्र प्रवसाचा मार्ग माहीत नसतो. कारण उजाडणारा प्रत्येक दिवस,अवचित उभा ठाकणारा पेच प्रसंग अन् थबकणारा क्षण कसा असेल! हे सांगणं निर्मात्याशिवाय सर्वांना अनभिज्ञ. मात्र त्यातून मार्ग काढणं आणि येणाऱ्या क्षणाची चाहूल आणि चाल ओळखणं हे मोठं आव्हान आणि कौशल्य आहे. हे कौशल्य ज्यांना अवगत व आत्मसात करता आलं त्याला जीवनाचा ब्रम्हानंद अनुभवता येतो.
जीवन प्रवास म्हणजे भूतकाळाचा धांडोळा घेऊन वर्तमान वास्तव स्वीकारणं आणि भविष्याचा वेध घेत मार्गक्रमण करणं. 
जीवन एक संघर्ष आहे मात्र जीवन प्रवासात सहप्रवाशांना दिमतीला घेऊन येणाऱ्या अडचणी सोडवत, आनंदयात्री होता आलं पाहिजे. 
जीवन म्हणजे संगीत आहे फक्त सूर गवसला पाहिजे.  
जीवन एक रीत आहे प्रित जुळवता आली पाहिजे. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू यातील प्रवास आहे. जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसलं तरी. हे अंतर आपण कसं कापतो. यावर आपल्या जगण्याचं मूल्य ठरतं. आपल्या जगण्यामुळं इतरांचं जीणं सुसह्य झालं तरच ते खरं जीणं.....
     .......🖋️ डॉ परमेश्वर पाटील

Saturday, September 21, 2019

*साधना कन्या प्रशाला बार्शीतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीनी घेतला VK Mart येथील प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्रभेटीचा अनुभव*

शिक्षणशास्त्र महाविद्यालय,बार्शी बी. एड. द्वितीय वर्ष सत्र-३ सन-२०१९-२०*सराव अध्यापन व शालेय आंतरवासिता* शाळा : शेठ मु.व.ज. साधना कन्या प्रशाला , बार्शी
आज वार शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी  बी.एड. प्रशिक्षणार्थीनी यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीना बाजार व व्यावसायिक अध्ययन अनुभव, खरेदी- विक्री इत्यादी विषयी माहिती व्हावी म्हणून प्रत्यक्ष इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीनी  VK Mart, Solapur Road Barshi,  या Super Market  चा क्षेत्रभेटीतून अनुभव मिळवा म्हणून प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले होते.
सदर भेटीत VK Mart मध्ये विद्यार्थिनीना प्रत्यक्ष विविध वस्तू, खरेदी-विक्री, विविध वस्तू विभाग, विविध आॅफर ,त्यांची मांडणी इत्यादीविषयी माहिती देण्यात आली . विद्यार्थीनीनीही  उत्सुकतेने अनेक प्रश्न विचारले. येथील  कॅश काउंटर विभागाचे प्रमुख श्री संकेत सोनवणे, फॅसिलिटी प्रमुख श्री हिरेमठ व कु. सना शेख यांनी अंतर्गत विविध विभाग, मालाची आवक, विक्री, बिलिंग सॉफ्टवेअर, सुरक्षा, ग्राहक सेवा, पार्किंग चिल्ड्रन्स पार्क   व इतर सर्व सोयी सुविधांची माहिती दिली. व व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक बाबीही सांगितल्या.
या क्षेत्रभेटीसाठी बी.एड. प्रशिक्षणार्थी कु.मुळे प्रियांका , अभिरूप पर्यवेक्षिका कु.कांबळे लक्ष्मी, कु. अश्विनी भोसले,  अभिरूप उपमुख्याध्यापिका सौ मोनिका देशपांडे , आभिरुप मुख्याध्यापक श्री विजयसिंह देवकर आदींनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी इयत्ता सातवी शालेय  वर्गशिक्षक श्री शिनगारे सर, बी. एड.प्रशिक्षणार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते.
या क्षेत्रभेटीच्या नियोजन आयोजनातील सहकार्यासाठी शालेय मुख्याध्यापिका सौ विनिता काळे, VK Mart संचालक मंडळ व सर्व स्टाफ यांचे महाविद्यालयाच्या वतीने मन:पूर्व

क आभार...
हा क्षेत्रभेटीचा अनुभव सर्व शालेय विद्यार्थीनी व प्रशिक्षणार्थीच्या कायम स्मरणात राहील असाच संस्मृणीय अनुभव होता....

Saturday, September 14, 2019

'देश को एकता के सूत्र में बांधने वाली ' हिंदी'
 सिर्फ एक भाषा नही बल्कि भावों की अभिव्यक्ती हैं'

आईये हम सब मिलकर इसको अधिक से अधिक उपयोग में लायें

हिंदी दिवस
की हार्दिक शुभकामनाएं

*जीवन त्यांना कळले हो*

                                                                                             *जीवन त्यांना कळले हो*                         ...